अमळनेरमध्ये उमेदवार बदलण्याची शक्यता: राष्ट्रवादीच्या सर्वेत अनिल पाटील यांच्याबद्दल जनतेत नाराजी


अमळनेर:
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आणि मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री अनिल पाटील यांच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात जनतेचा रोष आढळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेत मंत्री पाटील यांच्या कार्यशैलीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे, ज्यामुळे पक्षाच्या उमेदवार बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.


शेतकऱ्यांची नाराजी:  

गेल्या दोन वर्षांत झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अनिल पाटील हे मदत व पुनर्वसन विभागाचे कॅबिनेट मंत्री असूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यास अपयशी ठरले आहेत, असा आरोप जनतेने केला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतरही अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. याव्यतिरिक्त, दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून अमळनेर आणि पारोळा तालुक्यांचा समावेश न झाल्यामुळे हा असंतोष अधिकच वाढला आहे.


कोरोना काळातील कामगिरीवर टीका:

कोरोना महामारीच्या काळात मंत्री अनिल पाटील यांनी दोन वेळा पॉझिटिव्ह असल्याचे कारण सांगत स्वतःला घरात बंद करून घेतले. त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील जनतेशी असलेले नाते तोडले आणि त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप नागरिक करत आहेत. कोरोना काळात जनतेच्या समस्यांवर उपाययोजना करण्यात अपयश आल्याने त्यांच्या विरोधात जनमत उभे राहिले आहे.


आतल्या घडामोडींची चर्चा:

अमळनेर चे माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील यांच्याशी अनिल पाटील यांचे तणावपूर्ण संबंध असल्याची चर्चा आहे. अनिल पाटील यांनी साहेबराव पाटील यांना बदनाम करण्याचा कट रचल्याचे आरोप जनतेतून होत आहेत. काही दिवसांपूर्वी धुळे येथे साहेबराव पाटील यांच्यासोबत अनिल पाटील यांनी केलेली ओली पार्टी आणि नंतरच्या काही दिवसात माफी मागण्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे.


लोकसभा निवडणुकीत स्मिताताई वाघ यांचा घात करण्याचा प्रयत्न: 

महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या पराभवासाठी अनिल पाटील यांनी आतून प्रयत्न केल्याचे बोलले जाते. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनाही याची माहिती आहे, आणि हे पक्षांतर्गत मतभेद उघड झाले आहेत.


अजित पवारांच्या कार्यक्रमाचा फज्जा:

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अमळनेर दौर्‍यात झालेल्या कार्यक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जनतेने कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यामुळे कार्यक्रमाचा फज्जा उडाला, आणि याचा रोष अजित पवार यांच्या मनात आहे, असे बोलले जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अमळनेर मतदारसंघात उमेदवार बदलण्याची चर्चा आहे. जर पक्षाने याबाबत वेळीच ठोस निर्णय घेतला नाही, तर भारतीय जनता पार्टीला अमळनेर विधानसभेची जागा सोडावी लागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post