जळगाव: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) द्वारे आयोजित पहिला एमटीडीसी "जळगाव ॲक्वाफेस्ट" 2 ते 4 ऑक्टोबर 2024 दरम्यान मेहरूण तलाव, गणेश घाट, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. आज राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या अनोख्या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
या जलक्रीडा महोत्सवामुळे जळगाव शहरातील नागरिकांना जल पर्यटनाचा थरारक आणि अनोखा अनुभव मिळणार आहे, आणि तोही अगदी परवडणाऱ्या दरात.
एमटीडीसी ॲक्वाफेस्ट 2024 हा एक महोत्सव नसून, महाराष्ट्रातील जल पर्यटनाला देशात अग्रगण्य बनवण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. या महोत्सवात एमटीडीसीच्या जलक्रीडा पर्यटनातील अनुभवाचे आणि क्षमतेचे प्रदर्शन केले जाणार आहे.
महोत्सवाचे मुख्य आकर्षणे:
बोट सफारी: शांत आणि सुरेख बोट राईडचा अनुभव.
सुपर फास्ट जेट स्की राईड्स: जलक्रीडांचा रोमांचक अनुभव.
सेलिंग बोट: हवेच्या तालावर रोमांचक सफर.
कयाकिंग: तलावात सुरक्षित आणि आनंददायी कयाक राईड.
फ्लाइंग फिश राईड: साहसी प्रवाशांसाठी अनोखी राईड.
बनाना राईड: कुटुंबीयांसाठी खास आकर्षण.
बंपर राईड: उत्साहपूर्ण अनुभव.
झोबिंग: पारदर्शक बॉलमध्ये पाण्यावर चालण्याचा अनुभव.
वॉटर इलेक्ट्रिक शिकाराः शांततापूर्ण बोट राईड.
स्कूबा डायविंग: पाण्याखालील जगाचा अनुभव एमटीडीसी तज्ञांच्या देखरेखीखाली.
या महोत्सवामुळे जळगावमधील नागरिकांना आकर्षक आणि नाविन्यपूर्ण जलक्रीडांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. एमटीडीसी जल पर्यटनामध्ये महाराष्ट्राला अग्रणी बनवण्याच्या उद्दिष्टाने काम करत आहे, आणि हा महोत्सव जलक्रीडांबद्दलचा थरारक अनुभव अत्यंत किफायतशीर दरात देण्यास सज्ज आहे.
याबरोबरच, पर्यटनमंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन सचिव जयश्री भोज यांच्या नेतृत्वाखालील एमटीडीसीचे जल पर्यटन प्रकल्प, जसे की नाशिक बोट क्लब, गणपतीपुळे बोट क्लब आणि भारतातील सर्वात मोठे स्कूबा डायविंग प्रशिक्षण केंद्र, IISDA, ही आकर्षणे लोकप्रिय होत आहेत. ह्या उपक्रमांनी स्थानिक मच्छीमार आणि आदिवासी युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.