डॉ. भूषण पाटील यांच्या कडे उपचार घेत असलेल्या कल्याणी देशमुख यांना रक्ताची गरज होती. मात्र, रक्ताचा तुटवडा असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. याची माहिती मिळताच प्रथमेश यांनी तत्काळ रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या कृतीतून माणुसकीचे उत्कृष्ट दर्शन घडविले.
प्रथमेश भाऊंच्या या तात्काळ मदतीमुळे कल्याणी देशमुख यांना वेळेत रक्त मिळाले आणि त्यांच्या उपचारांमध्ये अडथळा येऊ शकला नाही. या कार्याबद्दल प्रथमेश यांचे परिसरात मोठे कौतुक होत असून, त्यांचे हे माणुसकीचे पाऊल समाजातील इतरांना प्रेरणा देणारे ठरले आहे.
समाजातील गरजूंना मदत करण्याची त्यांची सततची वृत्ती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, ज्यामुळे त्यांच्याबद्दल आदराची भावना वाढली आहे.