अमळनेर मधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी सन्मान सोहळ्यात महिलांना आमिष दाखवून, धमकावून गर्दी जमवण्याचा केविलवाणा प्रयत्न


दिनांक 11 तारखेला अमळनेरमध्ये आयोजित महिलांचा कार्यक्रम सपशेल फेल झाला. उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच अनेक महिलांनी कार्यक्रमस्थळावरून माघारी फिरण्यास सुरुवात केली. कार्यक्रमात गोर गरीब महिलांना फोन मोबाईल आणि साड्या वाटण्याचे असे आमिष देऊन गर्दी वाढवण्याचा केविलवाणा प्रकार करण्यात आला होता. परंतु वस्तुस्थिती लक्षात येताच महिलांनी माघारी फिरण्यास सुरुवात केली.


महिलांना उपस्थित राहण्यासाठी "लाडकी बहीण योजना" अंतर्गत मिळणारे पैसे थांबवण्याची धमकी देण्यात आली होती. याशिवाय, मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस येणार असल्याचा गाजावाजा करून उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु दोघांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.


एक अंगणवाडी सेविकेने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले आहे की, "आम्हाला महिलांना आणण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post