अमळनेरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संत सखाराम महाराजांचे नाव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय - मंत्री अनिल पाटील यांची माहिती


अमळनेर: येथील पिंपळे रस्त्यावर स्थित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस संत श्री सखाराम महाराजांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. हा निर्णय मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी शुक्रवारी, ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत दिलीची माहिती माध्यमांना दिली. 


संत सखाराम महाराज हे अमळनेर प्रतिपंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी वाडी संस्थानाचे आद्य संत असून, संपूर्ण महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे थोर संत म्हणून त्यांची ओळख आहे. महाराजांचे अमळनेर हे प्रमुख स्थान असले तरी पंढरपूरसह महाराष्ट्रभर त्यांचा भक्त परिवार मोठ्या संख्येने पसरलेला आहे.


सद्यस्थितीत संत श्री प्रसाद महाराज हे सखाराम महाराजांच्या गादीचे प्रमुख असून, त्यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा अखंडितपणे चालविला आहे. अमळनेरच्या नागरिकांना संत सखाराम महाराजांवर विशेष श्रद्धा आहे. त्यामुळे, अमळनेर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे केली होती.


मंत्रिमंडळाच्या बैठकीत भक्तांच्या भावना विचारात घेऊन, संस्थेला संत सखाराम महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.

हे हि वाचा

मंत्री अनिल पाटील यांच्यावर राजपूत समाजाचा रोष

Post a Comment

Previous Post Next Post