आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली. एकाच टप्प्यात २८८ जागांसाठी मतदान होणार आहे, जे २० नोव्हेंबर रोजी पार पडेल. यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केले जाणार आहेत.
राज्यात एकूण १ लाख १८६ मतदान केंद्रे आहेत, आणि ९ कोटी ३ लाख मतदार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी येण्याचे आवाहन केले आहे. मतदान केंद्रावर मतदानासाठी न जाऊ शकणाऱ्यांसाठी घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उमेदवारांना २३ ते २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून, ३० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. आयोगाने यावेळी आश्वासन दिले की, २६ नोव्हेंबरच्या आधी राज्यात नवीन सरकार स्थापन होईल.