शेतकऱ्यांचे खरे साथीदार: मा. आ. शिरीषदादा आणि प्रा. डॉ. रविंद्र चौधरींचा दिवाळीपूर्वीचा आश्वासक निर्णय



शेतकऱ्यांचे कैवारी मा. आ. शिरीषदादा आणि प्रा. डॉ. रविंद्र चौधरी यांनी  दिवाळीत ऊस थकबाकी अदा करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश आणला


शहादा तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथे श्री नागाई देवी शुगर प्रा.लि.च्या माध्यमातून ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची थकीत रक्कम अखेर जमा करण्यात आली. माजी आमदार शिरीष चौधरी आणि प्रा. डॉ. रविंद्र चौधरी हे शेतकऱ्यांचे खरे कैवारी ठरले आहेत. दिवाळीच्या आनंदाच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर थकबाकी जमा करून त्यांनी शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सणाचा आनंद दिला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या गळीत हंगाम २०२२-२०२३ दरम्यान नागाई देवी शुगर प्रा.लि. कडून सुमारे १८.१७ कोटी रुपये थकीत होते. माजी आमदार शिरीषदादा, प्रा. डॉ. रविंद्र चौधरी, ओंकार शुगर अँड आलाईड प्रा.लि. चे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, आणि सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या प्रयत्नांमुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेत जमा झाली. शेतकरी वर्गात यामुळे मोठा आनंद व्यक्त होत असून, थकबाकी मिळाल्याने दिवाळीला त्यांचं घर उजळून निघालं आहे.

यावर्षीचा गळीत हंगाम नोव्हेंबरमध्ये वेळेत सुरू होणार असून, शेतकऱ्यांनी आपल्या कारखान्याला ऊस पुरवठा करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असणाऱ्या शिरीषदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात दिवाळीचा प्रकाश आणला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post