अमळनेर प्रतिनिधि :- अमळनेर विधानसभा मतदारसंघातील आदिवासी समाजाला पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न मंत्री अनिल पाटील यांच्या समर्थकांनी सुरू केला आहे. "देवाला पाणी वाहून शपथ घ्या आणि मगच पैसे घ्या," असा फर्मान देऊन मतांसाठी आदिवासींची दिशाभूल करण्याचा निंदनीय प्रयत्न केला जात आहे.
अमळनेरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांमध्ये इतका घाणेरडा खेळ कधीच झाला नव्हता. मात्र, अनिल पाटील आता या समाजावर दबाव टाकून गडूळ राजकारणाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
याआधीही त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यासाठी आश्वासन देऊन आदिवासी समाजाला फसवलं. ते आश्वासन अद्याप पूर्ण झालेलं नाही. आता मात्र, पैसे देऊन देव्हाऱ्यातल्या देवांच्या नावाने शपथ घेण्यास भाग पाडून मतदान खरेदी करण्याचा निंदनीय डाव रचला जात आहे.
आदिवासी समाजाचा हा अपमान आणि दिशाभूल खपवून घेतली जाणार नाही. मंत्री अनिल पाटील यांनी देव्हाऱ्यातून देव बाजूला काढून अजित पवारांचा फोटो ठेवण्याचा निर्णय घेतला असेल, पण आदिवासी समाजातील देव कोणत्याही लोभाला बळी पडत नाहीत.
येत्या २० नोव्हेंबरला, आदिवासी समाज मंत्री अनिल पाटील यांच्या या राजकीय डावाला परखड उत्तर देईल आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देईल.