अमळनेर (प्रतिनिधी): पाच वर्षांच्या कार्यकाळात अनिल पाटील यांनी २५०० कोटींचा निधी आणल्याचे मोठमोठे दावे केले, पण प्रत्यक्षात काय झालं? *अमळगाव ते हिंगोणे रस्त्याचे काम दोन वेळा करण्यात आलं तरीही, रस्त्याची अवस्था आजही दयनीय आहे.* पावसाळ्यात या रस्त्यामुळे अमळगाव, दोधवद आणि हिंगोणे येथील ग्रामस्थांना असह्य त्रास सहन करावा लागतो. मग, *२५०० कोटींचा निधी नेमका गेला कुठे?*
माजी आमदार शिरीष चौधरी यांचा थेट सवाल - डोळ्याला दिसेल असं विकासाचं काम दाखवा! "मी आमदार असून माझं काम बोलतंय; तुम्ही मंत्री आहात, तुमचं काम माझ्या कामापेक्षा पाच पट जास्त मोठं असलं पाहिजे," असा खडा सवाल शिरीष चौधरी यांनी केला आहे.
इतक्या मोठ्या निधीच्या घोषणांचा गाजावाजा होत असताना, *प्रत्यक्षात मात्र रस्त्यांचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे.* अमळगाव-हिंगोणे रस्ता याचा उत्कृष्ट उदाहरण आहे. रस्त्यावर फेरफटका मारल्यास, अनेक ठिकाणी तोडकी-मोडकी अवस्थेत दिसतो. अमळगाव येथील राजवाड्यालगतचं प्रवेशद्वार उभारल्यानंतर लगेचच कोसळलं, आणि त्याचे अवशेषदेखील आता दिसत नाहीत.
जेव्हा अनिल पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा अमळगाव गटाने त्यांना पुढे आणलं. पण आज त्याच गटाला दुर्लक्षित करून, त्यांनी त्यांच्या अपेक्षांचं मोल नाही ठेवले. *शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या घटकांवर सुल्तानी संकट आणलं आहे.* दुष्काळाच्या जाहीर झालेल्या संकटात अमळनेरला दुष्काळाची घोषणा का झाली नाही? शेतकऱ्यांना पिक विमासाठी तरसवलं, आणि तालुक्याला दुष्काळ यादीतून वगळून त्यांच्या आशांवर पाणी फिरवलं.
*मंत्री अनिल पाटील यांच्या भाषणात उपस्थित होण्याची आता जनतेला अजिबात इच्छा नाही.* आमदारांनी अपवादात्मक काम केलं तर, मंत्र्यांच्या अपेक्षांवर मात्र खूप मोठा फटका बसला आहे. *"फाटका असला तरी चालेल, पण तोंडाचा सुटलेला नको!"* अशीच भावना लोकांच्या मनात आता आहे.
हे निवडणुकीचं वर्ष आहे, आणि अमळनेर मतदारसंघातील जनता आता सजग झाली आहे. *अनिल पाटील यांनी जनतेच्या विश्वासाला तडा दिला आहे, आणि यावेळी जनता त्यांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहे!*