अमळनेर: मागच्या आठवड्यात माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांना गावकऱ्यांनी घोड्यावर बसवून सन्मान केला. ही भावना केवळ राजकीय नसून, खऱ्या माणुसकीची होती. “मातीतला माणूस” या गाण्याच्या माध्यमातून शिरीष दादांनी जनतेत आपुलकी जिंकली आहे, ज्यामुळे या गाण्याला अमळनेरमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
या सन्मानामुळे प्रेरित होऊन अनिल पाटील यांनीही शिरीष दादांच्या लोकप्रियतेची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांच्या आग्रहावर, त्यांनी स्वतःला “मातीतला माणूस” अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला. पण एकच प्रश्न उभा राहतो: “अनिलदादा, तुम्ही खरंच भूमिपुत्र आहात का? की ‘मातीतला माणूस’ हे केवळ राजकीय फायद्यासाठी वापरत आहात?"
स्थानिकांच्या मते, "खरं तर भूमिपुत्राचा टायटल शिरीष दादांना शोभेल, कारण त्यांचा जन्म अमळनेरमध्येच झाला आहे. अनिल पाटील मात्र तालुक्याबाहेरचे आहेत, तरी त्यांनी जबरदस्तीने ‘भूमिपुत्र’ ही उपाधी घेतली आहे."
"गेल्या पाच वर्षांत अनिल पाटील यांना मंत्री म्हणून अमळनेरच्या जनतेने साथ दिली होती, पण या पाच वर्षांत जनतेला केवळ निराशा आणि फसवणूक मिळाली," असं स्पष्टपणे स्थानिक सांगतात. जनतेला खऱ्या माणुसकीची गरज आहे – जी केवळ कामातून मिळते, जशी शिरीष दादांनी दाखवून दिली आहे.
शिरीष दादांच्या लोकप्रिय गाण्याची नक्कल करत "मातीतला माणूस" या प्रतिमेचा वापर करून स्वतःची ओळख बनवण्याचा प्रयत्न करणं, ही कृती गावकऱ्यांना हास्यास्पद वाटते. "ज्या प्रेमाचा मूळ स्रोत माणुसकी आहे, तो केवळ पैशांनी विकत घेता येत नाही," असे गावकऱ्यांनी ठामपणे सांगितले आहे.
"आम्हाला खरा माणूस हवाय, ढोंग करणारा नेता नव्हे," असे अमळनेरच्या जनतेने ठणकावून सांगितले. *"नक्कल करणाऱ्या खोटं बोलणाऱ्या नेत्याच्या प्रचारावर आमचा विश्वास नाही,"* असे शेतकरी, तरुण आणि महिलांनी ठामपणे सांगितले.
"का २५ गावांनी तुमची हकालपट्टी केली? एका मंत्र्याला गावकऱ्यांनी हकलून देणं याच्यापेक्षा कुठली मोठी लज्जास्पद घटना महाराष्ट्र चा ईतिहास होऊ शकते?हे सर्वात मोठं अपयश नाही का? असा विचार मंत्री अनिल पाटील यांनी स्वतः करावा," असे गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
"आता विचार करण्याची वेळ आली आहे, अनिलदादा. सुधारणा करा, कारण लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी केवळ प्रचार आणि पैसे(जो देखील तुमचा स्वकष्टाचा नाही)
पुरेसे नाहीत,"* असे ठामपणे अमळनेर तालुक्यातील शेतकरी, तरुण आणि महिलांनी सांगितले आहे.