शिरीषदादा मित्र परिवाराचं आव्हान – समाजातील एकता जपण्याची गरज!



*अमळनेर (प्रतिनिधी):* विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या पराभवामुळे घाबरलेले मंत्री अनिल पाटील आणि त्यांचा गट समाजात तेढ निर्माण करण्यासाठी खालच्या पातळीवर जात आहेत, असे आरोप शिरीषदादा मित्र परिवाराने केले आहेत. शिरीषदादा मित्र परिवाराने स्पष्ट केले की, विरोधकांचा पराभव जवळ येत असल्याने, त्यांनी स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून बॅनर फाडून घेणे, दगडफेक करून वातावरण खराब करणे आणि खोटे आरोप लावून समाजात असंवेदनशीलता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.


शिरीषदादा मित्र परिवारने निवडणुकीच्या या तणावपूर्ण वातावरणात मतदारांना आवाहन केले आहे की, "समाजात अशा प्रकारच्या घाणेरड्या राजकारणाला बळी पडू नका. सत्याच्या बाजूने उभे राहा, समाजातील शांतता, सौहार्द आणि एकता टिकवून ठेवा."


हे आव्हान एक सकारात्मक बदलावाचे प्रतीक ठरू शकते, ज्या अंतर्गत लोकांनी सत्य आणि प्रेमाच्या मार्गावर ठाम राहण्याचे ठरवले आहे. शिरीषदादा मित्र परिवाराने म्हटले आहे की, “आपल्या मतदारसंघात असत्य, तेढ आणि घातक राजकारणाला आता नकार देणे आवश्यक आहे."

Post a Comment

Previous Post Next Post