अनिल पाटील यांच्या 'मातीतला भूमिपुत्र' दाव्यावर जनतेकडून प्रश्नचिन्ह !


अमळनेर (प्रतिनिधी):
 महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांनी ११ नोव्हेंबर रोजी कार्यकारिणी मंडळाच्या सभेत स्वत:ला 'मातीतला भूमिपुत्र' म्हणून मांडले. परंतु, त्यांच्या या दाव्यामुळे मतदारसंघातील जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अनेक कठोर प्रश्न विचारले जात आहेत. *खरंच अनिल पाटील मातीतल्या माणसासारखे वागले आहेत का, की हा फक्त निवडणुकीचा राजकीय नारा आहे?*

"मी कधी कुणाला फसवले नाही, नोकरीसाठी पैसे गोळा केले नाही," असा दावा अनिल पाटील यांनी केला आहे. परंतु, प्रत्यक्षात अनेक शेतकरी, तरुण, आणि महिलांनी त्यांच्यावर फसवणुकीचे आरोप केले आहेत. *या अनुभवातून जनतेला कडू अनुभव आला आहे*, हे एक गंभीर मुद्दा आहे.

"मातीतल्या माणसासाठी काम केलं," असा दावा करताना मंत्री अनिल पाटील  यांनी शेतकऱ्यांच्या विम्यासाठी ठोस पावले का उचलली नाहीत? *ज्यांच्याकडे अधिकार होते त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले?* या प्रश्नाचे उत्तर अजूनही पाटील देऊ शकले नाहीत . शेतकरी बांधवांना त्यांच्या  विमाचा  हक्काचा पैसा अजूनही मिळालेला नाही. तर मंत्री अनिल  पाटलांनी केलेले हे विधान  खोटं आहे हेय दिसून येते

"जात-धर्म न पाहता काम केलं," असं जाहीर विधान करत त्यांनी राजपूत समाजाच्या समर्थनाचा मुद्दा उठवला. हे विधान खरंच मानायचं का? जातीय राजकारणावर आधारित प्रचाराचा आधार घेतला जातो, हे जनतेच्या नजरेतून सुटलेलं नाही. *मंत्री अनिल पाटील यांनी अमळनेर तालुक्यात जातीय राजकारण करून जनतेला फसवले होते. याच पाटलांनी निवडणुकीत पाटील समाजाचा वापर केला आणि आता राजपूत समाजाचा वापर करत आहेत.* एकीकडे जातीय राजकारणावर टीका करत असताना दुसरीकडे त्याच समाजाच्या मतांसाठी प्रयत्न करणे ही विरोधाभासी कृती आहे.

"शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी धरणाचं काम पूर्ण करायचं आहे," असे त्यांचे आश्वासन आहे, पण गेल्या पाच वर्षांत धरण प्रकल्प कितपत प्रगतीशील झाला आहे? हे आश्वासन फक्त निवडणुकीपुरते आहे ,हे आता जनता जणून आहे. *मंत्री अनिल पाटलांची ही थाप आहे, असे जनतेचा स्पष्ट प्रतिसाद निघत आहे.*

"राजकारणात जात पाहत नाही," असे विधान करूनही, राजपूत समाजाच्या मतांसाठी विशेष प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या या कृतीत स्पष्ट विरोधाभास दिसतो. *जात-धर्म न पाहता राजकारण करण्याचा दावा खरा आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे.*

मंत्री अनिल पाटील यांनी सभेत कार्यकर्त्यांना भावनिक मुद्द्यांवर बोलून प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, पण जनतेला आता भावनिक भाषणांनी समाधान मिळणार नाही; ठोस कृतीची अपेक्षा आहे.

"अनिल पाटील यांचा ‘मातीतला माणूस’ म्हणून दावा हा केवळ राजकीय नारा आहे का? की हा शिरीष चौधरी यांच्याशी तुलना करून मिळवलेला केविलवाणा प्रयत्न आहे? खरंच त्यांच्या कामात लोकहिताचा विचार केला गेला आहे का?"

आता मतदारसंघातील जनता या घोषणांच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष कृती आणि ठोस परिणामांची अपेक्षा करते. *फक्त राजकीय नारे देऊन विश्वास संपादन करण्याची वेळ आता संपली आहे.* जनतेला निवडणुकीत केवळ आश्वासनं नकोत; *त्यांना विकासाच्या कामांची खात्री हवी आहे.*

Post a Comment

Previous Post Next Post