मंत्री अनिल पाटील यांच्यावतीने CRP गटातील महिलांकडून खोट्या प्रचाराचा खेळ; घराघरात खोटा प्रचार करून महिलांचे ब्रेनवॉश करण्याचा आरोप


*अमळनेर (प्रतिनिधी):* मंत्री अनिल पाटील यांच्या "लाडकी बहीण योजना"च्या नावाखाली महिलांच्या भावनांचा गैरवापर आणि त्यांचे ब्रेनवॉश करण्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. *CRP गटातील महिलांना प्रचारासाठी पाठवून, धमक्या आणि चुकीच्या प्रचाराचा आधार घेतला जात असल्याचे उघड झाले आहे.*


 घरातील महिलांना सावधतेचा इशारा:

*"जर तुम्ही अनिल पाटलांसाठी मतदान केलं नाही, तर 'लाडकी बहीण योजना' बंद होईल,"* असा खोटा प्रचार महिलांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी केला जात आहे. गावकऱ्यांनी आपल्या घरातील महिलांना सावध करण्याचे आवाहन केले आहे.


प्रचार करणाऱ्या CRP गटातील महिलांची नावे समोर आली :

गावकऱ्यांच्या मते, या महिलांनी घरोघरी जाऊन खोट्या प्रचाराचा खेळ केला आहे:

- छाया पाटील, टाकरखेडा

- मनीषा पाटील (देशले), शहापूर

- नम्रता पाटील, कंदारी

- CRP महिला गट, बहादरवाडी

- नूतन विलास पाटील, बोहरा (ही महिला बाकी महिलांना लीड करत असून , धमकी  देखील देत ,इतर महिलांना मंत्री अनिल पाटलांच्या वतीने खोट्या प्रचारासाठी प्रवृत्त करत आहेत.)


गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या महिलांनी *"जर दादांसाठी मतं दिली नाहीत, तर योजना बंद होईल,"* असा खोटा प्रचार करत घराघरात भ्रम पसरवला आहे.


खोट्या अफवांचे जाळे:

"लाडकी बहीण योजना बंद होईल," अशा अफवांमुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. *"जर योजना सरकारी आहे, तर ती फक्त अमळनेरमध्येच कशी बंद होऊ शकते?"* असा सवाल महिलांनी उपस्थित केला आहे.


महिलांचा संताप आणि सवाल:

महिलांनी थेट विचारले आहे, *"मंत्री अनिल पाटील आमच्या स्वाभिमानाशी खेळ का करत आहेत? खोट्या प्रचारासाठी आमचा वापर का केला जात आहे?"* त्यांनी या प्रकाराला उघडपणे विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


गावकऱ्यांचा ठाम निर्धार:

गावकऱ्यांनी स्पष्ट केले की, *"या खोट्या प्रचाराला यावेळी सहन केलं जाणार नाही."


सावधान:

गावकऱ्यांनी आपल्या घरातील महिलांना सांगितले आहे की, *"खोट्या प्रचाराला बळी पडू नका. जर कोणी तुमच्या भावनांचा अपमान करत असेल, तर त्याला विरोध करा."* लोकशाहीत खोट्या प्रचाराला जागा नाही; आता जनतेचा ठोस निर्णय दिसेल. *महिलांची ताकद आता खोट्या प्रचाराच्या विरोधात उभी राहील.*

Post a Comment

Previous Post Next Post